वाशीत १०० कोटींना बॅंकाना गंडा घालणाऱ्या ४ जणांना अटक
नवी मुंबई : बँकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या ४ आरोपींना अटक करण्यात आलेय. यात व्दारका मिल्क मालक आणि पंजाब अँन्ड महाराष्ट्र बँक मॅनेजरचा समावेश यांचा समावेश आहे. नवी मुंबईमधील पंजाब नॅशनल बँकमध्ये लोन अपहार प्रकरणी अन्य तीन जणांना वाशी जणांना अटक केली आहे.
अटक आरोपीला आज रविवारी वाशी कोर्टात हजर करण्यात आले. बँकेच्या मॅनेजरने लोन पास करून त्याचे पैसे दुसऱ्या अकाउंटला टाकून लाखो रुपयांचा अपहार केला होता. पंजाब अँन्ड महाराष्ट्र बँकेबरोबर इतर बँकांना १०० कोटी रूपयांचा चुना लावणाऱ्या चार आरोपींना वाशी पोलीसांनी अटक केली. आरोपींमध्ये व्दारका मिल्क ब्रॅंन्डचा मालक कपिल राजपूत आणि पंजाब अँन्ड महाराष्ट्र बँक मॅनेजर राजेश गोयल यांचा समावेश आहे. कर्जाच्या बहाण्याने करोडो रूपये लाटणाऱ्यांमध्ये अजून तीन आरोपींचा शोध वाशी पोलीस घेत होते.
कंपनी उभारण्यासाठी द्वारका मिल्क ब्रॅंन्डचा एमडी कपिल राजपूत याच्यासह इतर तीन जणांना वाशी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. तर पोलीस कारवाई टाळण्यासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या कपिल राजपूतचा भाऊ मिथिलेस राजपूत यालाही लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तीन महिन्यांपूर्वी वाशी पोलीस ठाण्यात कपिल राजपूत विरोधात साडेसहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा झाला होता.
द्वारका मिल्कचा एमडी कपिल राजपूत, पंजाब अँन्ड महाराष्ट्र तत्कालीन बँक मॅनेजर राजेश गोयल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. व्दारका मिल्कचा मालक असलेल्या कपिल राजपूत याची विविध राजकीय नेत्यांबरोबर उठबस असायची. राजकीय वरदहस्त वापरून तो आजपर्यंत स्वत:वरील कारवाई टाळत होता. अखेर वाशी पोलिसांनी शनिवारी त्याला दिल्ली येथून अटक केली.
त्यांच्यासह अजून तीन आरोपींना वाशी पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये पंजाब अँन्ड महाराष्ट्र बँकेचा तत्कालीन मॅनेजर राजेश गोयल, व्दारका मिल्कचा संचालक मृगेशन आदीमुलन, इस्टेट ब्रोकर कौशिक तन्ना यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून पंजाब अँन्ड महाराष्ट् बँकेची करोडो रूपयांची कर्जरूपी फसवणूक केली आहे.