ठाणे : बातमी जुन्या वर्सोवा पूलासंदर्भात.अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ ते १७ मे दरम्यान या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. लोड टेस्टींगसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 


मुंबई तसंच ठाण्याकडून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक जुन्या वर्सोवा पुलावरून जाते. १५ सप्टेंबरपासून या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच पूल खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दररोज भीषण वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते.