अहमदनगर : मराठीत पहिल्यांदा १०० कोटींचा आकडा गाठणाऱ्या सैराट सिनेमावर राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी तोंडसुख घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोटीच्या कोटी उडाणे घेत असलेल्या सैराट सिनेमाने तरुण पिढीचं वाटोळं केलं, असं शिवतारे म्हणाले. शिवतारे यांनी हे वक्तव्य आदर्श गाव हिवरे बाजार येथे बोलताना केलं.


शिवतारे यावेळी म्हणाले,  'शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभं राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी दिला. इतकंच नाही तर अल्पावधित जास्त पैसा कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात', असंही अजब वक्तव्य शिवतारे यांनी केलं. युवकांनी अभ्यास करुन, स्वत:च्या पायावर उभं राहावं, मग सैराट व्हावं, असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे.