नाशिक:  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एप्रिलमध्ये उलथापालथ होणार का ? हे विचारायचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी नाशिकमधल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिलपर्यंत प्रतिक्षा करा, तुम्हाला मनसे काय ते कळेल, मनसे कसा आणि काय चमत्कार दाखवते ते, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 


नाशिकमध्ये मनसेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव विसरा आणि पक्ष वाढीसाठी कामाला लागा, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 


नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला आता जेमतेम एक वर्ष राहिलं आहे, त्याआधी मनसेचे नगरसेवकांवर सेना-भाजपची नजर असल्याचं बोलंल जात आहे. त्यावरूनही राज ठाकरेंनी अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. 


पक्षात कोण येतं कोण जातं, याचा मी कधीच धसका घेतला नाही, 2 कार्यकर्ते राहिले तरी त्याचे 20 लाख कसे करायचे हे मला माहिती आहे, असं राज ठाकरे म्हणाले.