लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली विठुरायाची पंढरी!
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या विद्युत रोषणाईनं मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघालंय.
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या विद्युत रोषणाईनं मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघालंय.
विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीनं विठ्ठल मंदिर, दर्शन मंडप आणि तुकाराम भवनावर केलेल्या रंगीबेरंगी विद्युर रोषणाईमुळे मंदिर परिसराचं सौंदर्य व्दिगुणीत झालंय.
लाखोंच्या संख्येत वारकरी पंढरपुरात
पंढरपूर आषाढी एकादशी वारीसाठी सहा लाख वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. या अंदाजानुसार मंदिर प्रशासनही आता कामाला लागलंय. मंदिर व्यवस्थानपानं सहा लाख लाडू प्रसादची जोरदार तयारी केलीय. यासाठी मंदिर समितीचे तीस कामगार दिवस रात्र लाडू बनवण्याच्या कामाल लागलेत.
दिवसाला तीस ते पस्तीत हजार बुंदिचे लाडू सध्या तयार करण्यात येत आहेत. कमी किमतीत दिला जाणारा लाडू वारकरी मोठ्या भक्ती भावाने विकत घेतात. त्यामुळे सर्वच भाविकांना प्रसाद मिळावा याकडे मंदिर व्यवस्थापनाचा कल आहे.