नाशिक : दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे.  आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 


नाशिकमध्ये १३.८, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ३५, दिंडोरीत ७, पेठमध्ये ६१.९, निफाडमध्ये १.२, सिन्नरमध्ये २, चांदवडमध्ये ४.४, देवळ्यात १.४, येवल्यात १, कळवणमध्ये ५.५, सुरगाण्यात ९ मिलीमीटर पाऊस २४ तासात झाला आहे.