कोपरगाव : गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावात पावसाळा असो की उन्हाळा. शहरवासियांना पाच दिवसाआडच पाणीपुरवठा होतो. अनेक वेळा त्यासाठी आंदोलनं झाली मात्र उपाययोजना काही झालेली नाही. आजही कोपरगावात पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 मध्ये चार नंबरच्या साठवण तलावासाठी दोन कोटी तीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी निविदा काढल्या. कामही सुरू झालं...परंतु कामातील त्रुटी आणि चौकशीच्या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून हे काम बंद आहे. त्यात आता मंजूर झालेल्या निधीपैकी 1 कोटी 40 लखांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे.


शासनानं हा निधी परत घेवू नये. रखडलेल्या तलावाचं काम सुरू करावं या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि मनसेनं आंदोलनं केली.