जलसंपदामंत्र्यांनी बैलगाडीवर स्वार होऊन केली जलयुक्त शिवाराची पाहाणी
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधा-यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडीत स्वार झाले.
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधा-यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडीत स्वार झाले.
पाचोरा तालुक्यातल्या लोहारा गावाच्या शेत शिवारात कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांची पाहणी करून नाला खोलीकरण केल्याने साठलेल्या पाण्याचं जलपूजन त्यांनी केलं. महाजन यांनी स्वतः विहिरीतून पाणी काढून प्यायलंही.