प्रशांत परदेशी, नंदूरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपुड्याटच्या आव्हानात्मक डोंगर रांगांमध्ये नंदुरबार जिल्हा वसलाय. या जिल्ह्यात असलेल्या 580 वाड्या आणि पाड्यामध्ये पाणीटंचाई असून अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागतेय. पाण्याच्या शोधासाठी नागरिकांना सकाळपासूनच बाहेर पडावं लागतंय. दरवर्षी हि पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. 


पाणी टंचाई दूर करण्यासाठी 36 गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्यात. तर 296 ठिकाणी कुपनलिका मंजूर करण्यात आल्यात अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. जिल्हा प्रशासन संभाव्य पाणी टंचाई संदर्भात दावा करत असलं तरी ग्रामीण भागात टंचाईचं चित्र भीषण आहे.