लातूर : दुष्काळाच्या दाहकतेनं होरपळलेल्या लातूरकरांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरजहून पाच लाख लीटर पाणी घेऊन निघालेली जलराणी पहाटे लातूरमध्ये दाखल झाली. मिरज रेल्वे स्थानकातून काल सकाळी ११च्या सुमारास १० टँक घेऊन ही विशेष एक्स्प्रेस निघाली. कुठलाही विशेष थांबा न घेता ही गाडी लातूरमध्ये आली. यावेळी लातूरकरांनी मोटरमन गार्ड आणि सोबत आलेल्या आरपीएफच्या जवानांचा खास सत्कार केला. 


सध्या ही गाडी लातूर स्टेशनच्या यार्डात उभी आहे. रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या एका खासगी विहिरीत हे पाणी रिकामं करण्यात येणार आहे. या खाजगी विहिरित पाणी उतरवलं जाणार आहे. यानंतर हे पाणी शुद्धीकरण करून पाणी शहरात पुरवलं जाणार आहे.