नाशिक : महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आणि हंडाभर पाण्यासाठी जनता मैलोंमैली पायपीट करत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संपातजनक प्रकार घडलाय. 


निफाड तालुक्यातल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्यातून कोपरगावला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं होतं. मात्र धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर कालवा फुटल्यामुळं लाखो लीटर पाणी वाया गेलं. अखेर काही तासांनंतर कालव्याची दूरूस्ती करण्यात आली. मात्र कोपरगावला पाणी पोहचण्यापूर्वीच कालवा फुटल्यानं पाणी बंद करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली. त्यामुळं पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळंच पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय.