सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झालीय. उदयनराजे हे राजघराण्याचे वंशज आहेत. ते भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. आता चंद्रकांतदादांच्या या ऑफरवर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.