धुळे : अनैतिक संबंधात पतीचा अडसर दूर करण्यासाठी, पतीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृताची पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. धुळ्यातील शिवसागर कॉलनीतील ही घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करून मृतदेह तोरणमाळच्या सिता नावाच्या खाईत फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयात हजर करण्यात आले, दोघांना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शिवसागर कॉलनीत राहणारे युवराज भिला परदेशी यांची हत्या करण्यात आली आहे. पत्नी कोमल युवराज परदेशी आणि तिचा प्रियकर प्रणिल मराठे यांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची घटना  २ ते ४ जुलै दरम्यान घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.


युवराज परदेशी बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला. परंतु नंतर पोलीस तपासात युवराजची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कोमल परदेशी आणि प्रणिल मराठेवर ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.