बालभारतीत रंगली होती अधिकाऱ्यांची दारूपार्टी?
राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातल्या बालभारती विभागाशी संबंधीची धक्कादायक बातमी, आता आपण पाहणार आहोत
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातल्या बालभारती विभागाशी संबंधीची धक्कादायक बातमी, आता आपण पाहणार आहोत. ही बातमी आहे बालभारती विभागात रंगलेल्या अधिकाऱ्यांच्या दारूपार्टीबाबतची.
बालभारती विभागाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता मंगळवारी झाली. त्यावेळी रात्री बालभारती विभागात दारु पार्टीचा कार्यक्रम केला गेला.
खोली क्रमांक ५१२ मध्ये ही दारु पार्टी रंगली. या खोलीबाहेर तब्बल २५-३० दारुच्या बाटल्या सापडल्या.
या घटनेची बालभारती विभागाचे संचालक सुनील मगर यांनी गंभीर दखल घेत, चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणी एका अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाणार असल्याचीही माहिती मिळत आहेत.