वाशिम : ज्या घरात किंवा घरमालकाच्या मालकीत शिक्का नसेल आणि त्यांनी ग्रामपंचायतीकडे कोणताही दाखल मागितला, तर त्यावर खाली असा शिक्का दिला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौचालय नसल्यास लालशिक्का बसणार आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनने एक अनोखा उपक्रम सुरू  केला आहे. लाल शाईत या दाखल्यावर विना शौचालय असा शिक्का असणार आहे.


वाशिम जिल्हा परिषदेने जनजागृतीची मोहिम सुरू केली आहे. याचाच हा एक भाग आहे,   घरोघरी शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करण्यासंदर्भात  या मोहिमेचा एक भाग आहे, शौचालय नसणाऱ्या कुटुंबियांना शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले जात आहे. 


 वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना अशा प्रत्येकी २ शिक्क्यांचे आणि एका पॅडचे वितरण करण्यात आले आहेत.