नाशिक : नाशिकच्या उत्तमनगर भागात गतिरोधकावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोभा भांबरे या आपला मुलगा आणि तीन वर्षाच्या नातवासह दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी गतिरोधकावर गाडी आली असताना तोल गेल्याने त्या खाली पडल्या. 


या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांनी स्वतःला सावरायच्या आत मागून येणाऱ्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय, मुलगा आणि नातू सुदैवाने सुखरूप आहेत मागील आठवड्यात अशाच एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता.