मुंबई : हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे. पण आपल्याच आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ६ आठड्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे महिलांवरची प्रवेशबंदी उठली असली तरी लगेच उद्यापासून हाजीअलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टा काय निर्णय देईल, त्यावर हाजीअली दर्ग्याची दारं महिलांसाठी खुली होणार की नाही, ते ठरणार  आहे. राज्यघटनेनं नागरीकांना दिलेल्या अधिकारानुसार पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळावा, याचा पुनरुच्चार करत हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 


नूरजहाँ नियाज आणि झाकिया सोमन या भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दर्ग्यातील कबरीजवळ महिलांच्या प्रवेश बंदी विरोधात याचिका दाखल केली होती.