मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने कार चालवणा-या महिलेनं दोन पोलिसांना उडवलं. लोणावळा मळवली येथे ही घटना घडली. कार चालवताना या महिलेचं त्यावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार दुभाजक तोडून दुस-या लेनमध्ये गेली. यावेळी तिथं बंदोबस्तासाठी उभ्या असणा-या दोन ट्रॅफिक पोलिसांना या कारने जोरदार धडक दिली.


गाडीच्या धडकेत हे दोन्ही पोलीस गंभीर जखमी झालेत. त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.