कल्याणमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी, महिला पोलिसाला केली मारहाण
येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काल रात्री फेरीवाल्यांनी चक्क कारवाई करणाऱ्या आर पी एफच्या महिला अधिकाऱ्याला कार्यलयात घुसून शिवीगाळ करत मारहान केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना अटक केली आहे.
कल्याण : येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काल रात्री फेरीवाल्यांनी चक्क कारवाई करणाऱ्या आर पी एफच्या महिला अधिकाऱ्याला कार्यलयात घुसून शिवीगाळ करत मारहान केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना अटक केली आहे.
या घटनेमुळे फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली असून धडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र हा प्रकार मंजे भ्रष्ट व्यवस्थेवर उलटलेले बुमरंगच असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बाचाबाचीनंतर कल्याण रेल्वे पोलिसातल्या सहाय्यक निरीक्षक प्रतिभा साळुंखेंना फेरीवाल्यांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. सुभम मिश्रा आणि दुर्गा तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. काल संध्याकाळी आरपीएफने कारवाई करायला सुरूवात केली. त्यावेळी फेरीवाले आणि आरपीएफच्या जवानांमध्ये वाद झाला. फेरीवाल्यांनी थेट आरपीएफच्या कार्यालयात जाऊन प्रतिभा साळुखेंना शिवीगाळ आणि मारहाण केली.
फेरीवाल्याची ही दादागिरी नवी नाही. गेल्या रविवारीच एका पालिका अधिकाऱ्यालाही अशीच मारहाण झाली होती. त्यावेळी फेरीवाल्यांची भाषा मगरुरीचीच होती. कल्याण रेल्वे स्थानकातल्या या फेरीवाल्यांवर असणाऱ्या प्रशासनाचा वरदहस्त आता त्यांच्याच अंगाशी येतोय. ऐन गर्दीच्या वेळी रस्ते अडवून खोळंबा वाढवण्यास कारणीभूत फेरीवाल्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे.