पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोंबी, नांगरणी, कांचवेल, गोतावळा, डवरणी, नटरंग, संतसूर्य तुकाराम ही त्यांची गाजलेली पुस्तक आहेत. कोल्हापूरमधलं कागल हे त्यांचं मूळ गाव आहे. 'झोंबी'कार म्हणून आनंद यादव प्रसिद्ध आहेत.