नाशिक : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारेज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत पळशीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धांगवायूनं आजारी होते. या आजारपणातच त्यांचं निधन झालं. पळशीकर हे 'नवभारत' या मासिकाचे संपादक होते. 


लोकशाही, समाजवाद आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली होती. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी वेगळी दृष्टी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपलाय.