हेल्मेट न घातल्याने पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
एकीकडे राज्यात हेल्मेटसक्तीच्या विरोधात राजकीय नेते सूर आळवत असताना दुसरीकडे हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. सुनील कुमार तिवारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे.
पुणे : एकीकडे राज्यात हेल्मेटसक्तीच्या विरोधात राजकीय नेते सूर आळवत असताना दुसरीकडे हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. सुनील कुमार तिवारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे.
विश्रांतवाडी परिसरातील धानोरी रोडवर एका कारनं त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचाकल घनास्थळावरुन पसार झाला असूनस पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या दुर्दवी घटनेमुळे हेल्मेटसक्ती का गरजेची आहे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.