उंच पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न तरुणाच्या अंगलट
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामधल्या सांगवडे इथल्या पवना नदीत दुपारी 5 मित्रांसोबत पोहायला गेला.
पुणे : उंच पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला. मुदतसीर तायर खान हा २२ वर्षांचा तरुण, पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामधल्या सांगवडे इथल्या पवना नदीत दुपारी 5 मित्रांसोबत पोहायला गेला.
त्यावेळी मुदतसीर नदीवरच्या उंच पुलावर चढला आणि थेट 40 फुटांवरुन त्यानं पाण्यात उडी घेतली. नंतर त्याची नदीत पुरती दमछाक झाली आणि तो पाण्यात बूडाला. हा सगळा प्रकार त्याच्या मित्रांनी मोबाइलमध्ये कैद केला.