चिंचवडमध्ये भर दुपारी युवकाची हत्या
चिंचवडमधील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर रविवारी दुपारी 3 च्या सुमारास 10 ते 11 जणांनी सिंमेटचे ब्लॉक डोक्यात घालून एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
चिंचवड : चिंचवडमधील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर रविवारी दुपारी 3 च्या सुमारास 10 ते 11 जणांनी सिंमेटचे ब्लॉक डोक्यात घालून एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
विनायक कैलास पाटोळे असं 18 वर्षीय मृत झालेल्या युवकाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीय.
विनायकची हत्या करणारे मारेकरीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून हा खून पूर्व वैमनस्यातून घडल्याचं पोलिसांनी सांगितल.