ठाण्यात तरुणाचा महिलेवर गोळीबार
ठाण्यात शुल्लक कारणावरून एका तरुणाने महिलेवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या गोळीबारात महिला जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाणे : ठाण्यात शुल्लक कारणावरून एका तरुणाने महिलेवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या गोळीबारात महिला जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महिलेचं नाव पार्वती ठाकूर असं असून तिच्यावर हल्ला करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीच नाव सुमेध करंदीकर आहे. सुमेध अंबरनाथचा असून सुमेधला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. करंदीकर न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचा तालुका प्रमुख आहे.
ही घटना बोरिवरील ते ठाणेदरम्यान घडलीये. ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी मध्ये ७० वर्षीय पार्वती ठाकूर त्यांच्या सुनेबरोबर प्रवास करत होत्या. त्यांच्या मागच्या सीटवर सुमेध गाडीत चढल्यापासूनच प्रवाशांशी हुज्जत घालत होता.
गाडी भांईंदर पाड्याजवळ आल्यावर त्यानं गावठी पिस्तूलातून गोळीबार केला. पार्वती ठाकूर यांच्या खांद्याला गोळी लागली. गोळीबारानंतर प्रवाशांनी सुमेधला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केलय. या प्रकरणाचा पुढील तपास ठाण्यातील कासारवडवली पोलीस करीत आहेत.