अमरावती : महानगरपालिका निवडणुकीत 45 जागा पटकावून भाजपानं एकहाती सत्तेचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या या दणदणीत विजयात सत्तारूढ काँग्रेसची मात्र वाताहत झालेली दिसतेय. काँग्रेसच्या महापौर रीना नंदा यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एमआयएमनं जोरदार मुसंडी मारून तब्बल 10 जागा पटकाविल्या आहेत. तर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांना खातंही उघडता आलेलं नाही. शिवसेना 7, बसपा 6 तर युवा स्वाभिमानने 3 जागी विजय मिळविला आहे.


अमरावती मनपाचा निकाल - एकूण जागा 87


भाजपा - 45


काँग्रेस - 14


एमआयएम - 10


शिवसेना 7


बसपा - 6


युवा स्वाभिमान पक्ष - 3


अपक्ष 1


आरपीआय - 1