मुंबई : डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईतल्या तीन रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये ४८, केईएम हॉस्पिटलमध्ये ५३ तर नायर हॉस्पिटलमध्ये ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातली सरकारी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर सलग पाच दिवस रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्च न्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. काही ठिकाणी काही डॉक्टर कामावर हजर झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. शिवाय सरकार आता निवासी डॉक्टरांशी चर्चा करणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांचा संप अजूनही सुरू आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयं सुरू होणार असली, तरी सरकारी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामावर येण्याची तसदी अजूनही घेतलेली नाही. आता या संपकरी डॉक्टरांना कामावर रुजू करण्याची जबाबदारी मार्ड आणि आयएमएच्या पदाधिका-यांवर असणार आहे.