14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पडली पार
14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पार पडली. सीएसटीवरुन 42 किमीच्या फुल मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चषक मॅरेथॉन पार पडली. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते.
मुंबई : 14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पार पडली. सीएसटीवरुन 42 किमीच्या फुल मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चषक मॅरेथॉन पार पडली. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते.
42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झालेले. यावेळीही आफ्रिकन धावपटूंचंच वर्चस्व मुंबई मॅरेथॉनवर दिसलं. दरम्यान, रियो ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ललिता बाबर आणि नाशिकची कविता राऊत आपल्याला यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये धसहभागी झाल्या नव्हत्या. मात्र खेतराम, मोहम्मद युनुस, ईलाम सिंग, अमनदिप कौर, मोनिका आथरे, ज्योती गावडे आणि स्यामली सिंगसारखे भारतीय धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले. तीन लाख 77हजार अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणूनही ओळखली जाते.