मुंबई : शिमगोत्सवासाठी कोकणकडे निघालेल्या चाकरमानींसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेनं दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ते करमाळी ही विशेष गाडी 10 मार्चला रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी सीएसटीहून सुटेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 मार्चला सकाळी 11 वाजता करमाळीला पोहचेल. त्याच दिवशी परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी करमाळीहून मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. आणि त्याच दिवशी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी मुंबईला पोहचेल.  


गाडीला सोळा डबे असतील, त्यात एसी टू टायर 1 , एसी थ्री टायरचे दोन डबे असतील. तर चार डबे स्लीपर क्लासचे असून 7 डबे सामन्य प्रवाशांसाठी असतील. 


दुसरी विशेष गाडी मुंबई ते मडगाव दरम्यान रविवारी 12 मार्चला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि सोमवारी दुपारी 12 वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी हीच गाडी सोमवारी रात्री 7 वाजून 40 मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं रवाना होईल.