26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधील बंडखोर महेश सावंत यांचाही या यादीत समावेश आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधील बंडखोर महेश सावंत यांचाही या यादीत समावेश आहे.
बंडखोरीनंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांना सहानुभूती मिळू नये, म्हणून शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या मुंबईतल्या 26 शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. घाटकोपरचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे, दशरथ शिर्के, माजी नगरसेवक शुभांगी शिर्के यांच्यासह 26 जणांना पक्षातून काढण्यात आलं आहे. 26 जणांपैकी 6 ने 7 जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना समजवण्यात आलं पण पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शेवटी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.