मुंबई : मुंबईच्या नागपाड्यात एक धक्कादायक घटना घडलीय. साडे तीन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही हत्या शेजारी राहण्या-या सोळा वर्षीय दोन मुलांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लहानगी 5 डिसेंबरला बेपत्ता झाली होती. अपहरणकर्त्यांनी 19 डिसेंबरला मुलीच्या आई वडिलांकडे खंडणी मागितली. 24 डिसेंबरला मुलीचा मृतदेह सापडला. या अपहरण नाट्यात या मुलांसोबत त्याचे पालकही सहभागी असल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. 


मुलीच्या वडिलांनी नवी गाडी घेतली ते पाहून यांच्याकडे भरपूर पैसे असतील असा विचार या मुलांनी केला आणि लालसेपोटी हा गुन्हा केलाय. 1 कोटींची खंडणी घेऊन ठाणे परिसरात या मुलांनी चिमुरडीच्या वडिलांना बोलावलं होतं.  पण अपहरणकर्त्यांकडून सतत हे ठिकाण बदलल जात होतं. कारण त्यांच्यापैकी एका मुलाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. 


खरंतर ज्या दिवशी मुलीचं अपहरण केलं त्याच दिवशी मोबाईल चार्जरच्या वायरनं गळा दाबून मुलीची हत्या केली होती. पण तरीही तिच्या वडिलांकडून ही दोन्ही मुलं खंडणी मागत होती. पण पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी एकाला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्यापुढे अखेर या मुलांनी गुन्हा कबूल केला.