मुंबई : विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत विधानसभेत चर्चा होऊन चार महत्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यात आली. त्यात नगरपालिका आरक्षण आणि वॉर्ड रचनेचं विधेयकही समाविष्ट आहे. 


या विधेयकाच्या चर्चेत विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलूच दिलं नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.  नव्या कायद्यात  वॉर्ड रचनेत 4 प्रभागांचा एक वॉर्ड आणि नगराध्यक्षाची थेट निवड करण्यासंदर्भातली तरतूद करण्यात आलीय. 


याचविषयी आज अजित पवार आणि जयंत पाटलांनी विधानसभेतही आवाज उठवला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी यापुढे असं होणार नाही, याची काळजी घेऊ असं आश्वासन दिलंय.