मुंबई :  शिवसेनेचे चार मंत्री आज रात्री मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, विजय शिवतारे, दिपक केसरकर यांचा समावेश आहे. 


दरम्यान या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी बातचित केल्यावर समजले की, उत्तर प्रदेशात जाहीरनाम्यात भाजपने ज्या प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे सांगितले तो न्याय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लावण्यात यावा आणि त्यांनाही कर्जमाफी मिळावी. 


स्थायी समितीप्रमाणे राज्य मंत्रीमंडळ बैठकीत पारदर्शकता असावी, असाही मुद्दा मांडण्यात येणार आहे. 


 सरकारबाबत 'कदम' 


- भाजपा हा घातकी, विश्वासघातकी, कपटी, पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे
- अशा कपटी मित्रा बरोबर मैत्री नको
- त्यांचा टेकू काढून घ्यावा अशी आमच्या सर्व मंत्र्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे 
- म्हणजे मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळेल, असेही कदम यांनी यावेळी म्हटले आहे.