कलिना आरटीआय कार्यकर्ता हत्येप्रकरणी ४ जण ताब्यात
कलिनामध्ये ६० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी चार संशियातांना ताब्यात घेण्यात आलंय. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
मुंबई : कलिनामध्ये ६० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी चार संशियातांना ताब्यात घेण्यात आलंय. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
या ४ संशियातांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या हत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी घरमालकानंच ही हत्या केल्याचा आरोप भुपेंद्रच्या कुटुंबियांनी केला होता. भूपेंद्र आणि घरमालकात वाद सुरु असल्याची माहितीही भुपेंद्रच्या कुटुंबियानी दिली होती.