मुंबई : दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 49 गोविंदा जखमी झाले आहेत.यामधल्या नऊ गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. तर इतरांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.


सायन रुग्णालयात पाच गोविंदांवर उपचार सूरू आहेत. तर इतरांवर नायर आणि केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत जखमींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या वर्षी तब्बल 364 गोविंदा जखमी झाले होते. तसंच गेल्या वर्षी  दुपारी तीन वाजेपर्यंत 58 गोविंदा जखमी झाले होते. कोर्टाच्या निर्णयामुळे यंदा अपघाताला आळा बसल्याचं दिसून येतंय.