शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.
मुंबई : राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयीचं पत्रही राजपत्रित अधिकारी महासंघाला दिलंय... महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आलीय.
महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग दि कुलथे आणि सरचिटणीस समीर भाटकर बैठकीला उपस्थित होते. देशातल्या अनेक राज्यांनी पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना स्वीकारलीय. ९ राज्यांनी ही संकल्पना अंमलातही आणलीय. त्यामुळे लवकर महाराष्ट्रातही ही संकल्पना लागू होईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवाय शाळा आणि महाविद्यालयं देखील पाच दिवस सुरु ठेवता येतील का यावरही सध्या चाचपणी सुरू आहे...या शिवाय, राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या, महिलांसाठी दोन वर्षांची बाल संगोपन रजा मिळावी अशीही महासंघाची मागणी असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.