मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून चक्क गायब झालेल्या विद्यार्थ्यांची... वर्षानुवर्षं हे विद्यार्थी गायब असतात, पण महापालिकेच्या रेकॉर्डवर त्यांची नोंद तशीच का राहते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेच्या २३४ शाळांमधील तब्बल ५३ हजार विद्यार्थी गायब आहेत. गेल्या चार पाच वर्षांपासून ते शाळेत गैरहजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शिक्षण समिती सदस्यानं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उजेडात आलीय. या विद्यार्थ्यांची नावं हजेरी पटावर आहेत पण हे विद्यार्थी शाळेतच येत नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्याचं नाव पहिलीत नोंदवलं, तर तो विद्यार्थी शाळेत येवो किंवा न येवो, पाच वर्षांनी त्या विद्यार्थ्यांचं नाव पाचवीच्या हजेरी पटावर असतंच.


नियमांची ऐसी की तैसी...


'शिक्षण हक्क कायद्या'नुसार कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढतां येत नाही आणि आठवीपर्यंत पास करायचं, असा नियम आहे. पण तरीही वर्षानुवर्ष शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं मुंबई महापालिकेनं हजेरी पटावर ठेवणं, कितपत योग्य आहे? असाही सवाल आता विचारला जातोय.


आदित्य ठाकरे इकडे लक्ष घालणार का?


केजी टू पीजी शिक्षणाचा गोंधळ असा महामोर्चा काढणारी युवा सेना आणि युवा सेवा प्रमुख आदित्य ठाकरे या ५३ विद्यार्थ्यांचा शोध घेणार का? आणि हे विद्यार्थी शाळाबाह्य का आहेत याचे उत्तर शोधणार का? हे पहाणंही महत्वाचे आहे. 


केवळ एवढंच नाही, तर सतत गैरहजर राहणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांचं अनुदान, शिक्षण साहित्य आणि त्यांच्यावर होणारा खर्च हा जातो कुठे? असाही प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महापालिकेनं या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे. अन्यथा शिवसेनेच्या युवराजांना मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.