मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याची चर्चा करणाऱ्या सहा संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे सहा संशयित मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची चर्चा करत असताना एका जागरुक नागरिकाने त्यांचं बोलणं ऐकल... त्यानंतर त्यानं ताबडतोब रेल्वे पोलिसांना फोन करुन या चर्चेबाबत आणि संशयितांबाबत माहिती दिली. 

त्यानुसार पाळत ठेवून आरपीएफने त्या सहा संशयितांना ताब्यात घेतलंय. आरपीएफ सूरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सहा जणांच्या चौकशीत काही आक्षेपार्ह गोष्ट आढळल्या असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरु राहणार आहे..