मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं गुडन्यूज दिलीये. १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेली महागाई भत्त्यातली ६ टक्के  वाढ १ सप्टेंबरपासून रोखीने देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय. आठ महिन्यांच्या थकबाकीबद्दल स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे. या वाढीमुळे महागाई भत्त्याचा दर ११९ वरून १२५ टक्के झालाय. या निर्णयाचा लाभ सुमारे साडेपंचवीस लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. 


राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी जानेवारीपासून रखडलेला ६ टक्के महागाई भत्तावाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. १ सप्टेंबरपासून ही वाढ मिळणार आहे, मात्र मागील आठ महिन्यांची थकबाकी नंतर देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंदाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारीपासून ६ टक्के महागाई भत्तावाढ जाहीर केली होती. ती वाढ त्याच तारखेपासून मिळावी, अशी राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटनांची मागणी होती