मुंबई : अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी २४ तास'च्या पाठपुराव्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यंदा नीट अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याने इतर राज्यांनी तिथल्या स्थानिक मुलांसाठी अभिमत विद्यापीठात जागा राखीव ठेवल्या होत्या. परंतु महाराष्टृाने असा निर्णय घेतलाच नव्हता.


भूमिपुत्रांवर होत असलेल्या या अन्यायाला झी २४ तासने वाचा फोडली होती. भूमिपुत्रांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नाबाबत बघ्याची भूमिका घेतली होती.


महाराष्टृात १० अभिमत विद्यापीठांमध्ये मेडिकल पोस्ट ग्रँज्यूएशनच्या ७८७ जागा आहेत. तर ८ डेंटलच्या अभिमत विद्यापीठांमध्ये पोस्ट ग्रँज्यूएशनच्या २६४ जागा आहेत. तसंच खासगी मेडिेकल कॉलेजमध्ये मेडिकलच्या 352 जागा आहेत. आता या ठिकाणी 67 टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव असतील. महाराष्ट्र सरकारने जागा राखीव ठेवण्यासंदर्भात जीआर काढला आहे.