नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा बीग बी यांच्यासोबत एक फोटो समोर आला... आणि त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये अमृता फडणवीस लाल रंगाच्या वन पीसमध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. या फोटोवरून आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी आरएसएसवर निशाणा साधलाय. 


मुख्यमंत्र्यांची पत्नी जर दुसऱ्या राज्याच्या किंवा गैर भाजप मुख्यमंत्र्यांची पत्नी असती तर या लोकांनी त्यांचं जगणं कठिण करून टाकलं असतं. परंतु, आरएसएसच्या बॅकग्राऊंड असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून त्या सुरक्षित आहेत. 


'मुख्यमंत्र्यांची पत्नी असणं हा काही गुन्हा नाही. मुख्यमंत्र्यांना मला फक्त एव्हढचं सांगायचंय की त्यांनी ढोंग करणं बंद करावं. आरएसएसचे लोक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पेहरावाचं समर्थन करत असतील तर ते ढोंग करत आहेत. आरएसएसला महिलांच्या स्वातंत्र्याचा विरोध टाळावा लागणार' असंही लांबा यांनी म्हटलंय.


'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे अलका लांबा यांच्या मताशी सहमत असतील का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे आपले व्यक्तीगत विचार असल्याचं म्हटलंय.