मुंबई : झाकीर नाईक यांच्यावर सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उडी घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाकीर नाईक हे जर दहशतवादाचा प्रचार करत होते तर तेव्हा आपल्या सुरक्षा यंत्रणा झोपलेल्या होत्या का? असा सवाल अबू आझमी यांनी केलाय. नाईक यांना उगाचच टार्गेट करण्यात येतंय, असंही आझमी यांचं म्हणणं आहे. 


'आरोप खपवून घेतले जाणार नाहीत'


याबाबत, भाजपच्या सत्यपाल सिंग यांना लाज वाटायला हवी. ते पूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी तेव्हाच झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करायला हवी होती. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे कोणताच पुरावा नव्हता. नाईक यांच्यावर उगाचच आरोप झाले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असं अबू आझमी यांनी म्हटलंय. 


झाकीर नाईक परदेशातच...


झाकीर नाईक मुंबईतल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बांग्लादेशात झालेल्या अपहरण आणि हत्या नाट्यातल्या दहशतवाद्यांनी जाकीर नाईकच्या उपदेशातून प्रेरणा घेऊन हल्ला केल्याचा दावा केला होता. तेव्हापासून झाकीर नाईक यांच्या फाऊंडेशनची कसून चौकशी सुरू झालीय. सध्या, नाईक परदेशातच तळ ठोकून आहेत.