मनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
मनसेच्या इशाऱ्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिलंय. मनसेचे कार्यकर्ते नेहमी गुंडगिरी करतात. कलाकारांना धमकी देण्याचा काय अर्थ आहे.
इतकंच आहे तर पाकिस्तानी दूतावास राज ठाकरेंनी बंद करावा. तसेच इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावास व्हिसा देते तेही थांबवावे. केवळ महाराष्ट्रातच का संपूर्ण देशात थांबवावे. नक्षलवाद्यांविरोधात काम करावे. दम असेल तर सुसाइड बॉम्बर पाकिस्तानात पाठवा, असे आझमी यांनी म्हटलेय.