मुंबई : नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता मुख्यमंत्री महोदय आपल्या वाढत्या वजनाबद्दल चांगलेच काँन्शियस झालेत. त्यांनी आपलं वजन बरच कमी केले आहे. गेले काही दिवस आपण फक्त वेज सूप, वाफवलेल्या भाज्या, पोळी, भात असंच जेवण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी वाढदिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांचं डाएट सिक्रेट शेअर केले. आपण तीन महिन्यात १८ किलो वजन कमी केले. आता २१ किलो वजन कमी केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 


यावेळी अमृता फडणवीस यांनीही सीएमबाबत काही सिक्रेट शेअर केले. दिवसभरात केकचा एक तुकडाही सीएमनी खालला नसल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय सकाळीच आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी आपल्या मुलाला वाढदिवसाची बक्षिसी म्हणून १००० रुपयांची नोट दिली. तर त्यांची मुलगी दिविजाने त्यांना दोन ग्रिटिंग कार्डस दिलेत. एका कार्डमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दुसऱ्या कार्डमध्ये जगातल्या सर्वात चांगले पिता तुम्हीच आहात असा संदेश दिविजानं लिहीला होता.