विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांनी धुडकावला काँग्रेसचा फॉर्मुला
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.
सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव दिला होता मात्र सिटींग जागा आम्ही कशा सोडणार असा सवाल अजित पवारांनी काँग्रेसला विचारला आहे. नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अपक्षांना पाठिंबा देणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे. विलास लांडे आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी पक्षाने भरपूर पदं दिली आहेत. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष तिकीट भरण्याच्या फंद्यात पडू नये असंही पवारांनी म्हटलं आहे.