मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपनं युती तोडली आहे. निवडणुकांच्या प्रचारामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करत आहेत. पण शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडेंनी शिवसेनेसोबतच्या युतीचे संकेत दिले आहेत. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची युती होऊ शकते, असं विनोद तावडे म्हणालेत.


झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. तावडेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी दिसलेला फॉर्म्यूला पाहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.