मुंबई : नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही. विमानाने गेलो आणि विमानाने आलो, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेश चर्चेबाबत पूर्णविराम मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणे यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांच्या घेतलेल्या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 'नारायण राणे साहेबांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. 
'सिंधुदुर्गात आम्ही लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुरु करीत आहोत. त्यासाठी आवश्यक साहित्याची पाहणी करण्यासाठी मीही राणे साहेबांसोबत गेलो होतो, असे नितेश यांनी स्पष्ट केले.


लपून छपून गेलो नव्हतो. काल सायंकाळी विमानाने गेलो आणि आज सकाळी मुंबईत परत आलो. जर आम्हाला काही लपवाछपवी करायचीच असती तर खासगी विमानाने गेलो असतो. पण आमच्या मनात तसे काहीच नाही, असे नितेश राणे म्हणालेत.