आनंद शर्मांची अभाविप विरोधात तक्रार
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना मारहाण झाल्याबद्दल, त्यांनी अभाविपविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूकॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते आले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना मारहाण झाल्याबद्दल, त्यांनी अभाविपविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूकॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते आले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी रविवारी सकाळी आनंद शर्मा यांनी वसंतकुंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आनंद शर्मा यांना शनिवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या वेळी ‘अभाविप‘ कार्यकर्त्यांनी केलेल्या हाणामारीमध्ये शर्मा यांच्या कानास दुखापत झाली. या घटनेचा काँग्रेसने निषेध केला आहे. पंतप्रधान मोदींनी यावर उत्तर द्यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.