मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी एटीएम अजूनही सुरू होऊ शकलेले नाहीत, सकाळी १० पर्यंत एटीएम उघडतील असं सांगितलं जात होतं, पण आता एटीएम उघडण्यास दुपारचे १ वाजणार असल्याची शक्यता आहे.


कारण अनेक ठिकाणी कॅश उपलब्ध होण्यास उशीर होत असल्याने एटीएम उघडण्यासही उशीर होत आहे. एटीएम उघडण्यास दुपारचे १ वाजण्याची शक्यता आहे. तेव्हा एटीएमसेंटर समोर ग्राहक खुलजा सीम सीम म्हणत, एटीएम उघडण्याची वाट पाहत आहेत.