मुंबई : 'झी 24 तास'नं अनाथांच्या व्यथा मांडणारा कार्यक्रम सादर केल्यानंतर सरकारनंही त्याची गंभीर दखल घेतलीय. 


शासकीय, निमशासकीय तसंच खासगी बालगृहांमधल्या अनाथ मुलांना बालाधार कार्ड देणार असल्याची घोषणा महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलीय. बालाधार कार्डमुळं अनाथ बालकांना नवी ओळख मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.